Distillery,
आमच्या साखर कारखान्याचे आधार स्तंभ व बिहार राज्याचे माजी राज्यपाल मा . पद्मश्री डॉ . डी . वाय . पाटील साहेब यांचे सातत्याने मौलिकविचार आणि त्यांचे आदर्शतत्वे मार्गदर्शन नेहमीच दृष्टीक्षेपात ठेवून कारखान्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावून प्रगतशील कामे यशस्वीरीत्या पार पाडण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. आमचा साखरकारखाना हा कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील डोंगराळ व अतिप्रजन्यमान भागातील कारखाना म्हणून ओळखला जातो . अनेक अडचणीना सामोरे जावून आम्ही प्रति वर्षी यशस्वी ऊस गाळप केले आहे . कारखान्याचा चाचणी गळीत हंगाम शुभारंभ दि .१० मार्च २००३ रोजी महाराष्ट्र राज्याचेतत्कालीन मुख्यमंत्री सन्मानीय सुशिलकुमार शिंदे यांचे शुभहस्ते झाला होता . आज अखेर एकूण १८ गळीत हंगाम यशस्वी रित्या पूर्ण झालेले आहेत . कारखाना कार्यक्षेत्रामधील ऊस उत्पादक शेतकरी हा केंद्रबिंदु मानुन त्यांचे जीवनमान सुधारणेस कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध पातळीवर मदत देण्याचे काम केले जाते . कारखाना कार्य क्षेत्रातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांचे प्रति एकरी ऊस उत्पादन वाढविणेसाठी शेती ऊस विकास विभाग मार्फत अंमलबजावणी चालू असून वेगवेगळे प्रयोग , नवीन ऊस जाती , जैविकखते , सूक्ष्म अन्नद्रव्ये खते , रासायनिक खते , ऊस रोपे यांच्या माध्यमातून शेतकरी बंधू लाभ घेत आहेत . कारखान्यास ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफ . आर . पी . प्रमाणे किंबहुना त्यापेक्षा ज्यादा दराने मोबदला दरवर्षी देणेत आला आहे . त्यामुळे शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र राहिलेला एक साखरकारखाना म्हणून ओळख निर्माण झालेली आहे .
http://dypsugar.com//upload/documents/sample.pdf
http://dypsugar.com//upload/documents/sample.pdf
http://dypsugar.com//upload/documents/sample.pdf
.