पद्मश्री डॉ . डी . वाय . पाटील सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर
पदमश्री . डॉ .डी .वाय . पाटील सहकारी साखरकारखाना लि , ज्ञानशांतीनगरता . गगनबावडा , जि . कोल्हापूर हा कोल्हापूर पासून ५० किमी अंतरावर पश्चिमेकडील बाजूस स्थापित झालेला आहे . कारखान्याची गाळप क्षमता २५०० टी .सी . डी . असून २० मेगावॅटको . जनरेशन व ४५ के . एल . पी . डी . क्षमतेचा आसवानी प्रकल्प कार्यान्वित झालेला आहे . कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये कोल्हापूर गगनबावडा , पन्हाळा , राधानगरी , व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी व कणकवली तालुक्यातील मिळून एकूण १०२ गावांचा समावेश आहे . सदरचे गाव मधून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा चांगल्या प्रतीचा ऊस कारखान्यास गाळपास आणला जातो . कारखान्यामध्ये विविध विभाग कार्यरत असून त्यामध्ये प्रशासन , शेती , इंजिनिअरिंग , उत्पादन , अकौंट डिस्टिलरी , को जनरेशन , स्टोअर , सिव्हिल , टाईप इ . सर्व विभागातील मिळून एकूण कामगार कार्यरत आहेत .
आमचे साखर कारखान्यास आतापर्यंत वसंत दादा शुगर इन्स्टिटयूट कडून खालील प्रमाणे पुरस्कार मिळालेले आहेत.
उत्कृष्ठ तांत्रिककार्यक्षमता पुरस्कार सन २०१०-२०११
उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन ( कै . कर्मयोगी शंकररावजी पाटील पुरस्कार ) सन २०१६-२०१७
आमच्या साखर कारखान्या द्वारे विविध सामाजिक कार्ये केली जातात आणि सतत आपल्या शेतकरी बांधवाना सहकार्य केले जाते .